नवी दिल्ली / वृत्तसंस्था
हरिद्वार येथे डिसेंबर 2021 मध्ये धर्मसंसदेदरम्यान द्वेषपूर्ण भाषण केल्याचा आरोप अससेल्या जितेंद्र नारायण त्यागी उर्फ वसीम रिझवी याला सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी जामीन मंजूर केला. जामीन मंजूर करताना न्यायालयाने या प्रकरणाबाबत प्रसारमाध्यमांमध्ये भडकाऊ वक्तव्ये न करण्याची अट घातली आहे. सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी 17 मे रोजी त्यागी यांना आरोग्याच्या कारणास्तव अंतरिम दिलासा दिला होता. त्यानंतर त्यांनी 29 ऑगस्ट रोजी आत्मसमर्पण केले होते. आता न्यायालयाने जामीन मंजूर केल्याचा रिझवीला दिलासा मिळाला आहे.