आतापर्यंत एकूण 1608. 2 मि. मी. पाऊस
तुडये : बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशय परिसरात सप्टेंबर महिन्याच्या आठ तारखेपासून तुरळक प्रमाणात पाऊस झाल्याने पाणीपातळी स्थिर राहिली आहे. 14 दिवसांत 73.5 मि.मी. इतका पाऊस झाला आहे. गुऊवारी सकाळी जलाशयाची पाणीपातळी 2475.10 फूट इतकी होती. एक सप्टेंबर रोजीच्या 2475.30 फूट पाणीसाठा स्थिर असून एक-दोन इंचाने पाणीपातळी कमी-जास्त झाली आहे. मागीलवर्षी याचदिवशी पाणीपातळी 2476.75 फूट होती. दीड फुटाने पाणीपातळी जादा होती. जलाशयाची सर्वात वरची पाणीपातळी ही विस्तारलेली असल्याने एक फूट पाणी किमान दहा दिवस शहराला पुरवठा करता येते.
आतापर्यंत एकूण 1608.2 मि. मी. पाऊस
आतापर्यंत एकूण 1608.2 मि. मी. पाऊस झाला आहे. दरवर्षीच्या मानाने यावर्षी पाऊस कमी झाला आहे. सप्टेंबर महिन्यात एकूण 76.4 मि. मी. पाऊस झाला आहे.