दिवसातून किमान चार ते पाच वेळा भरपूर पाणी प्यावे, हा आरोग्यशास्त्राचा नियम आहे. पण तो माणसांसाठी आहे. इतर प्राणी प्रजाती, पक्षीप्रजाती यांच्यासाठी हे नियम भिन्नभिन्न आहेत. चातक पक्षी हा भारतीयांना नवीन नाही. तो पावसाची वाट पहात असतो. कारण तो पहिल्या पावसाचे पाणी पितो. नंतर वर्षभर तो पाण्याला चोच लावत नाही. चातकाचे इंग्रजी नाव जॅकोबिन कोयल असे आहे.
तो एक वर्षात केवळ एकदाच पाणी पितो ही कपोलकल्पित कथा आहे, असे मानले जात होते. पण आता याचा पुरावा मिळाला असून हीं केवळ सांगोवांगीची कथा नाही हे सिद्ध झाले आहे. चातक पक्षी प्रामुख्याने उत्तराखंडात सापडतो. तो काही प्रमाणात बिहारमध्येही आढळतो. त्याच्यावर सरैयामन पक्षी अभ्यायारण्यातील तज्ञांनी प्रयोग केले आहेत. त्याचे एकदा पाणी पिणे झाले की मग वर्षभर त्याला पाणी पिण्यास कितीही उद्युक्त करण्याचा प्रयत्न केला तरी तो बधत नाही. त्याच्या खाण्यात परिवर्तन केले तरी तो पाणी पीत नाही. जणूकाही त्याची तहान लुप्त झालेली असते. या प्रयोगांमधून त्याच्यासंबंधीचे हे सत्य समोर आले आहे. तसेच हा पक्षी मान्सूनच्या पावसाचे अनुमान अत्यंत अचूकपणे वर्तवतो, असे म्हटले जाते. त्यावरही प्रयोग सुरु असून हेही सत्य ठरेल असा तज्ञांचा विश्वास आहे.