प्रतिनिधी/ बेळगाव
गुड्सशेड रोडवरील हनुमान मंदिरानजीक पाईपलाईनला गळती लागली आहे. दुरुस्ती काम हाती घेण्यात येणार असल्यामुळे रविवारी दक्षिण विभागात पाणीपुरवठ्यात व्यत्यय येणार आहे, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.
शनिवारी यासंबंधी एक पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. घुमटमाळ टँकला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनला गळती लागली आहे. शनिवारी तातडीची दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यामुळे सोमवार दि. 17 जुलैपर्यंत राजारामनगर, मांगिरीश कॉलनी, राणी चन्नम्मानगर पहिले व दुसरे स्टेज, वडगाव, शहापूर, हिंदवाडी, टिळकवाडी, नानावाडी, आदर्शनगर, जुने बेळगाव, ओमकारनगर, महावीरनगर, ब्रह्मनगर, मजगाव व दक्षिण विभागातील प्रायोगिक तत्त्वावरील पाणीपुरवठ्यात व्यत्यय येणार आहे.