देगाव बहुग्राम पाणी पुरवठा योजनेच्या कॅबिनेट बैठकीत मंजुरी
प्रतिनिधी/ खानापूर
बहुग्राम पाणी पुरवठा योजनेतून तालुक्यातील 106गावाना पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. देगाव बहुग्राम पाणी पुरवठा योजनेच्या शुक्रवारी झालेल्या कॅबिनेट बैठकीत मंजुरी मिळाली आहे. तालुक्यातील 106 गावांना या योजनेचा लाभ होणार आहे. या योजनेत नवलतीर्थ धरणातून पाणी पुरवठा करण्यात येणार आहे . यासाठी याबाबतची माहिती तालुका भाजप पदाधिकाऱ्यानी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत आज दिली यावेळी तालुका भाजपा अध्यक्ष संजय कुबल जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, माजी जि. पं. सदस्य बाबुराव देसाई, चेतन मणेरीकर, पंडीत ओगले,राजु रायका, इतर पदाधिकारी उपस्थित होते.