वार्ताहर /लाटंबार्से
डिचोली तालुक्मयातील साळ येथील ‘तळपीर’ येथे कार्यान्वित केलेल्या वीज उपकेंद्राला वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांनी नुकतीच भेट देऊन पाहणी केली. आपण ग्रामीण क्षेत्राकडे विशेष लक्ष देत असून या वीज उपकेंद्राला वीज पुरवठा करणाऱया वीज वाहिन्या बदलून भूमिगत घालण्यासाठी प्रयत्न करणार आहे, अशी ग्वाही यावेळी ढवळीकर यांनी दिली.
यावेळी त्यांच्या बरोबर डिचोली मतदारसंघाचे आमदार डॉ. चंद्रकांत शेटये, लाटंबार्से जिल्हा पंचायत सदस्य प्रदीप रेवोडकर, गोवा राज्याचे मुख्य विज अभियंते स्टीफन फर्नांडिस तसेच विभाग नंबर पाच उपविभाग एकचे कार्यकारी अभियंता (डिचोली)चे श्री वल्लभ, सहाय्यक अभियंता डिचोली – निळकंठ, अक्षय पाळणी, उजैनी देऊलकर आदी आदमी कनि÷ अभियंते तसेच कासारपाल क्षेत्रातील कनि÷ अभियंते रामा सावंत तसेच साळ विद्युत उपकेंद्रातील गणेश काजारी, शामसुंदर परब, समीर राऊत, रूपेश परब व यांच्यासह साळचे सरपंच घनश्याम राऊत, पंच देवीदास नाईक, पंच बिंदिया राऊत, अडवलपालचे माजी सरपंच नारायण साळगावकर, जिल्हा पंचायत माजी सदस्य संजय शेटये व संदीप राऊत व अन्य उपस्थित होते.
वीज उपकेंद्र हे प्रामुख्याने ग्रामीण भागाशी संबंधित आहे पण अजूनही काही प्रमाणात समस्या आहे. त्यामुळे जंगल भागातून आलेल्या वीजवाहिन्या पावसाळय़ात वाऱयामुळे झाडाच्या फांद्या तुटून पडून तारा तुटणे, खांब मोडतात. त्यामुळे वीज खंडित होते. या भागातील मुख्य समस्या सोडवण्यासाठी मुख्यत्वे भूमिगत वीज वाहिनी असणे फार महत्त्वाचे आहे तरी वीज मंत्र्यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी माजी जिल्हा पंचायत सदस्य संदीप राऊत यांनी केली. शेवटी कनि÷ अभियंता रामा सावंत यांनी आभार मानले.