गणरायाच्या पाठोपाठ आज गौराईचे घरोघरी थाटामाटात झालं आगमन

सुवासिनींनी एकत्र येऊन गौराईच्या डहाळ्यांना घातले स्नान 

लहान मुली आणि तरूणींनी गौराईच्या गितांवर धरला फेर

 गौराईच्या डहाळ्यांना नदीच्या पाण्याने स्नान घालण्यासाठी  महिला साज-शृगांर करत नटून-थटून आल्या.

केसात गजरा,दंडावर बाजूबंद,कमरपट्टा आणि सुंदर डिझायन्सच्या साड्या पाहायला मिळाल्या

यावेळी ढोल-ताशांच्या ठेक्यावर एका मुलीने डोक्यावर घागर घेत  ताल धरला.

  सुवासिनी, लहान मुली आणि तरूणींनी फेर धरून  गौराईची आळवणी केली.