कंपनीने देशातील पहिली इथेनॉलवर चालणारी बाईक लॉन्च केली आहे. कंपनीने हे नवीन अपडेट सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या रॉयल एनफील्ड क्लासिक 350 बाइकमध्ये केले.

Yellow Star

कंपनीने इथेनॉलवर चालणारेE-20 कंप्लायन्स मॉडेल मर्यादित डीलरशिपना पाठवण्यास सुरुवात केली आहे. माहितीनुसार, या बाईकमध्ये 80 टक्के पेट्रोल आणि 20 टक्के इथेनॉल मिसळून इंधन वापरता येईल. बाकी ही बाईक आधीच्या बाईकप्रमाणेच असेल

या नवीन Royal Enfield Classic 350 मध्ये 349cc सिंगल सिलेंडर इंजिन आहे. हे शक्तिशाली इंजिन20.2 bhp आणि 27 Nm पीक टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 5-स्पीड गिअरबॉक्सशी जोडण्यात आले आहे.

Royal Enfield Classic 350 ची बाजारात सुरुवातीची किंमत 1.93 लाख ते 2.25 लाख रुपये एक्स-शोरूम आहे. ही बाईक 41 kmpl चे मायलेज देते. सुरक्षेसाठी या बाईकच्या दोन्ही चाकांमध्ये डिस्क ब्रेक्स देण्यात आले आहेत. याशिवाय, ॲनालॉग स्पीडोमीटर, टेल लाईट्ससह सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल मिळते.

Multiple Blue Rings

सी हेवी मोलॅसेस इथेनॉलची किंमत 49.41 रुपये प्रति लिटर, बी हेवी मोलासेस इथेनॉलची किंमत 60.73 रुपये प्रति लिटर आहे.

ROYAL ENFIELD