ब्रिटीश पंतप्रधानांना भेट म्हणून दिली ऊद्राक्ष जपमाळ
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जी-20 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आपल्या पत्नीसह शुक्रवारी सायंकाळी दिल्लीत दाखल झाले. जी-20 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी आलेल्या सुनक दाम्पत्याचे पालम विमानतळावर भारतीय परंपरेनुसार विशेष आदरातिथ्याने स्वागत करण्यात आले. ब्रिटनच्या पंतप्रधानांना ऊद्राक्षमाळ, श्रीमद् भगवतगीता आणि हनुमान चालिसाही भेट देण्यात आल्या.
भारतीय वंशाच्या ब्रिटीश पंतप्रधानांचे स्वागत करताना केंद्रीय मंत्री अश्विनी चौबे यांनी ‘जय सियाराम’ असे म्हटल्याचे त्यांचे माध्यम सल्लागार पंकज मिश्रा यांनी सांगितले. आपण बिहारमधील बक्सरमधून एक खासदार असून बक्सरमध्येच भगवान श्रीराम आणि त्यांचे बंधू लक्ष्मण यांनी गुऊ महषी विश्वामित्र यांच्याकडून दीक्षा घेतल्याची एक पुराणकालीन आठवणही चौबे यांनी करून दिल्याचेही त्यांनी सांगितले. ऋषी सुनक यांनी ही घटना मोठ्या कुतूहलाने ऐकली. ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसोबत भारतात आले आहेत. आपल्या घरी भारताची सून-जावई आली आहेत, असेही केंद्रीय मंत्री गंमतीने म्हणाले. चौबे यांनी सुनक दाम्पत्याला सीतामढी आणि बांका मंदार पर्वतांची माहिती दिली आणि हे सर्व जाणून दोघेही खूप आनंदी झाले.