जोल्ले ग्रुप ऑल इंडिया ए ग्रेड कबड्डी स्पर्धा
वार्ताहर /निपाणी
जोल्ले ग्रुपच्यावतीने येथील म्युनिसिपल हायस्कूलच्या मैदानावर ऑल इंडिया ए ग्रेड कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत संपूर्ण देशभरातून महिला व पुऊषांच्या एकूण 80 संघांनी सहभाग घेतला आहे. शुक्रवारी दुसऱ्या दिवशी झालेल्या सामन्यात प्रतिस्पर्धी संघांना पराभूत करत वेस्टर्न रेल्वे, जम्मू-काश्मीर पोलीस, सीआरपीएफ दिल्ली संघांनी विजयी सलामी दिली.
वेस्टर्न रेल्वे विऊद्ध म्हैसूर स्पोर्ट्स या महिला संघादरम्यान झालेल्या सामन्यात वेस्टर्न रेल्वे संघाने 38 गुण मिळवत विजय नोंदविला. प्रतिस्पर्धी म्हैसूर स्पोर्ट्स संघाला फक्त 17 गुण करता आले. साऊथ सेंट्रल रेल्वे व जवाहर शुगर कोल्हापूर या महिला संघादरम्यान झालेल्या सामन्यात साऊथ सेंट्रल रेल्वे संघाने 35 गुण करत विजय नोंदविला. तर जवाहर शुगर कोल्हापूर संघाने फक्त 10 गुण केले. कासगोड म्हैसूर विऊद्ध जी. के. अकादमी दिल्ली महिला संघादरम्यान झालेल्या सामन्यात कासगोड म्हैसूर संघाने 46 गुण घेत एकतर्फी विजय नोंदविला. जी. के. अकादमी दिल्ली संघाला फक्त 12 गुण करता आले.
पुऊष संघ जम्मू-काश्मीर पोलीस विऊद्ध वेस्ट बंगाल या सामन्यात वेस्ट बंगाल संघाने 46 गुण करत विजय नोंदविला. तर जम्मू-काश्मीर संघाला फक्त 14 गुण करता आले. बेळगाव टायगर्स विऊद्ध पै. स्पोर्ट्स स्कूल हरियाणा दरम्यान झालेल्या सामन्यात पै. स्पोर्ट्स स्कूल संघाने 46 गुण करत विजय नोंदविला. प्रतिस्पर्धी बेळगाव टायगर्स संघाला फक्त 36 गुण करता आले. सीआरपीएफ दिल्ली विऊद्ध बारामती स्पोर्ट्स दरम्यान झालेल्या चुरशीच्या सामन्यात सीआरपीएफ दिल्ली संघाने 35 गुण मिळवत विजय नोंदविला. बारामती स्पोर्ट्स संघाने 30 गुण केले.
दुसऱ्या दिवसाचे सामने पाहण्यासाठी कबड्डी शौकीनांनी मोठी गर्दी केली होती. हे सामने चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी, शिवबसव महास्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात पार पडले. स्वागत करून युवा नेते बसवप्रसाद जोल्ले यांनी मतदारसंघात मंत्री शशिकला जोल्ले व खासदार आण्णासाहेब जोल्ले यांनी केलेल्या विकासकामांचा आढावा घेत सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, सहकार अशा सर्वच क्षेत्रात दिलेल्या योगदानाची माहिती दिली. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कबड्डी स्पर्धा अजून दोन दिवस चालणार असून रविवारी अंतिम सामन्यातून चषक व रोख बक्षिसाचे मानकरी ठरणार आहेत.