बेळगाव- देशात कोरोनाच्या चौथ्या लाटेची बातमी समोर आली आहे. राज्यातील कोरोनाची चौथी लाट टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना योजना लागू करण्याची विनंती करत विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी केली. यावर आरोग्य व वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉ. के. सुधाकर म्हणाले की, आज दुपारी ३ वाजता मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली बैठक होत आहे. त्याचवेळी आज दुपारी पंतप्रधान मोदींसोबत बैठक होणार आहे. त्यांच्याकडून मिळालेल्या मार्गदर्शनाची अंमलबजावणी केली जाईल. तिसरा म्हणजे बूस्टर डोस फक्त 20% प्रभावी आहे. यादरम्यान घरातील सदस्यांना प्रथम इथूनच लसीकरण करून जनजागृती सुरू करण्याचे सांगण्यात आले. आ. बंडेप्पा काशमपूर यांनी तिसऱ्या डोस देण्याबाबत जनजागृती करण्याचा सल्ला दिला. विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी बूस्टर डोस अनिवार्य करण्याचा सल्ला दिला. आ. जमीर अहमद यांनीही लॅबची संख्या वाढविण्याचा सल्ला दिला. आ. एच.के.पाटील म्हणाले की, एसीमुळे विषाणू पसरतो, जर हे खरे असेल तर एसी न चालवण्याचा सल्ला दिला जातो.
सीएम बोम्मई म्हणाले की, मागच्या वेळीही तो इतर देशांतून पसरला होता. या विषाणूचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने गांभीर्याने विचार केला आहे. तर जनतेला बुस्टर डोसमध्ये रस नाही. पूर्व खबरदारीबाबत आजच्या बैठकीत चर्चा करण्याचे सांगितले आहे .
Trending
- सलून व्यावसायिकाचा कोल्हापूर लोकसभेसाठी अर्ज दाखल! सायकलवरून अर्ज भरून दिला पर्यावरणाचा संदेश
- महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना मोठया मताधिक्य देण्यासाठी कामाला लागा- मंत्री चंद्रकांत पाटील
- अत्यंत साध्यापद्धतीने काँग्रेस उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांनी भरला उमेदवारी अर्ज
- नेसरी पोलिसांकडून आंतरराज्य टोळीतील म्होरक्यासह चौघे जेरबंद
- जिल्ह्यात पारा गाठू शकतो 42 अंश उन्हाच्या तडाख्यापासून वाचणार कसे..?
- संजय मंडलिक श्रीराम चरणी लीन! रामनवमीनिमित्त कागलसह कोल्हापूर मधील उत्सवात सहभाग
- काँग्रेसचे खलप, विरियातो यांचे अर्ज सादर
- वेदांतासोबतच्या कराराबाबत गोवा फाऊंडेशनची तक्रार