टाकळीवाडी तालुका शिरोळ येथील सुपुत्र पांडुरंग निर्मळे प्यारा मिलिटरी यांचा आज ३६ वा वाढदिवस विधवा महिला अक्काताई वाघमारे व चंद्राबाई निर्मळे यांचे कडून ओवाळणी करून वाढदिवस साजरा करण्यात आला. अनिष्ट प्रथा, रुढी, परंपरा, यांना मागे टाकत. निर्मळे परिवाराने एक चांगला उपक्रम चालू केलेला आहे. याची सर्वांनी अनुकरण करावे विधवा महिला सुद्धा या मानवच आहेत. हा संदेश यातून मिळत आहे.
आज वाढदिवसानिमित्त गावातील जागृत देवस्थान यल्लमा (जग) म्हसोबा व बिरोबा पालखी यांना सुद्धा आमंत्रित करण्यात आले होते.यावेळी विशेष प्रतिनिधी एस.एस.बी (प्यारा मिलिटरी) चे सुशांत महाडिक साहेब उपस्थित होते. यांनी बोलताना म्हणाले की आम्हाला देश सेवा करताना आनंद वाटतो.
सध्या पांडुरंग निर्मळे आतापर्यंत १६ वर्षे ड्युटी करत आहेत. आतापर्यंत त्यांनी पश्चिम बंगाल दिल्ली अरुणाचल प्रदेश व आता सध्या ते १५५०० फूट वरती ड्युटी साठी तैनात आहेत. अतिशय परिस्थिती धोकादायक आहे .परंतु देश सेवा ही महत्त्वाची आहे यातून दिसून येते. या वाढदिवसाला अनिल पवार, प्रकाश ठोंबरे ,दत्ता रबकई ,प्रकाश चव्हाण, राजाराम चव्हाण, समस्त निर्मळे परिवार , पै, पाहुणे संपूर्ण कुटुंब यावेळी मोठ्या उत्साहात संपन्न होते.