माजी आमदार अनिल बेनके यांचे प्रतिपादन
बेळगाव : कर्नाटक क्षत्रिय मराठा परिषदेच्या राज्य कार्यालयाच्या बेंगळूर येथे झालेल्या वार्षिक बैठकीत मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी उचलल्या जाणाऱ्या उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीवेळी माजी आमदार अनिल बेनके यांनी बेळगाव जिल्हा कर्नाटक क्षत्रिय मराठा परिषदेचे अध्यक्ष या नात्याने आज मी प्रदेशाध्यक्ष सुरेश साठे व राज्य पदाधिकारी यांच्या उपस्थितीत बेळगावमधील सदाशिवनगर येथील सीटीएस क्र. 10917 च्या 20 वषर्च्यां लीजवरील मालमत्तेची संपूर्ण आर्थिक देखभाल माझ्या स्वखर्चाने करेन, असा संकल्प केला. येत्या काळात कर्नाटक, महाराष्ट्र व गोवा या राज्यांच्या सीमावर्ती भागातील विद्याथ्यर्नां एक भव्य वसतिगृह बांधून मोफत निवासाची सोय केली जाईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी प्रदेशाध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच सर्व जिल्ह्यांचे के. के. एम. पी. पदाधिकारी उपस्थित होते.