शिवसेनेचा निर्धार
बेळगाव / प्रतिनिधी
1 नोव्हेंबर रोजी सीमावासियांतर्फे काळादिन पाळण्यात येतो. यानिमित्त काढण्यात येणाऱया निषेध फेरीमध्ये हजारोंच्या संख्येने सीमाबांधव एकवटतात. ही निषेध फेरी यशस्वी करण्याचा निर्धार शिवसेनेच्या बैठकीत करण्यात आला. शनिवारी रामलिंगखिंड गल्ली येथील मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या बैठकीत हा निर्धार करण्यात आला.
जिल्हा प्रमुख प्रकाश शिरोळकर यांनी कोल्हापूर शिवसैनिकांचे मशाल मोर्चाच्या आयोजनाबद्दल कौतुक केले. यावेळी तालुका प्रमुख सचिन गोरले, दिलीप बैलूरकर, प्रवीण तेजम, राजकुमार बोकडे, महेश टंकसाळी, दत्ता पाटील, रमेश माळवी, बाळू मासरनकर, प्रकाश हेब्बाजी, महिपाल चितापल्ली, सुरेश राऊळ, सतीश हट्टीकर, राजू कनेरी यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.