नवी दिल्ली
पंजाबच्या गुरदासपूरचे खासदार सनी देओलने 2024 ची लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याचे म्हटले आहे. गदर-2 या चित्रपटाला मिळालेल्या मोठ्या यशामुळे सनी देओलने राजकारणातून बाहेर पडत केवळ अभिनेता म्हणून काम करण्याचा निर्णय घेतला आहे. आता मी केवळ एक अभिनेता म्हणून सक्रिय राहणार आहे. एकावेळी मी एकाच क्षेत्रात लक्ष केंद्रीत करू इच्छितो असे सनी देओलने एका मुलाखतीत नमूद केले आहे.