केएससीए धारवाड विभागीय 14 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धा
बेळगाव : कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना मान्यताप्राप्त धारवाड विभागीय क्रिकेट संघटना आयोजित केएससीए धारवाड विभागीय 14 वर्षाखालील आंतरक्लब क्रिकेट स्पर्धेत टॅलेंट स्पोर्ट्स हुबळीने एसडीएम धारवाड संघाचा 34 धावांनी तर हुबळी स्पोर्ट्स क्लब अ संघाने श्री सिद्धारुढ स्वामी स्पोर्ट्स क्लब हुबळी संघाचा 9 गड्यांनी पराभव करुन प्रत्येकी 4 गुण मिळविले. मारुफ, जॉय सुलद यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
केएससीए हुबळी मैदानावर खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात टॅलेंट स्पोर्ट्स हुबळी संघाने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 3 गडी बाद 248 धावा केल्या. त्यात सलामीवीर जॉय सुलदने 10 चौकारांसह नाबाद 112 धावा करीत शतक झळकाविले. त्याला अभिषेक एस. ने. 6 चौकारांसह 60, अभिनव शर्माने 1 षटकार, 5 चौकारांसह 35 धावांचे योगदान दिले. एसडीएम धारवाडतर्फे आर्यन ताडपत्रीने 43 धावात 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना एसडीएम धारवाड संघाने 50 षटकात 9 गडी बाद 214 धावाच जमविल्या. त्यात आर्यन ताडपत्रीने 9 चौकारांसह 49, रेहान सय्यदने 24, नवीनने 23 तर जोशुआने 21 धावा केल्या. टॅलेंटतर्फे कार्तिकने 26 धावात 2 तर हसन, अभिषेक व अभिनव यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
हुबळी येथील आरआयएस मैदानावर खेळविण्यात आलेल्या सामन्यात श्री सिद्धारुढ स्वामी स्पोर्ट्स क्लब संघाने प्रथम फलंदाजी करताना 21.2 षटकात 6 गडी बाद 46 धावा केल्या. त्यात आर्यनने 10 धावांचे योगदान दिले. हुबळी स्पोर्ट्स क्लबतर्फे मारुफने 8 धावात 3, ईश्वर, युवराज व शशांक यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना हुबळी स्पोर्ट्स क्लबने 6.3 षटकात 1 गडी बाद 47 धावा करुन सामना 9 गड्यांनी जिंकला. त्यात अमृतने 11 तर यशने नाबाद 10 धावा केल्या. सिद्धारुढतर्फे धीरजने 1 गडी बाद केला.