उद्यमबाग पोलीस स्थानकात एफआयआर
प्रतिनिधी /बेळगाव
राजारामनगर उद्यमबाग येथील एक महिला आपल्या दोन मुलींसह चार दिवसांपासून बेपत्ता झाली आहे. यासंबंधी उद्यमबाग पोलीस स्थानकात शुक्रवारी एफआयआर दाखल करण्यात आले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
मनीषा आनंद वाघ (वय 30), मुलगी आर्वी आनंद वाघ (वय 9), आयुषी आनंद वाघ (वय 5) अशी त्यांची नावे आहेत. 10 जानेवारी रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत मनीषा आपल्या दोन मुलींसह बेपत्ता झाली असून आनंद वाघ याने शुक्रवारी उद्यमबाग पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे.
आनंद हे मुळचे रायबाग तालुक्यातील कंकणवाडीचे. खासगी कारखान्यात काम करतात. सध्या पहिला क्रॉस, राजारामनगर, उद्यमबाग येथे कुटुंबीयांसह त्यांचे वास्तव्य आहे. मोठी मुलगी आर्वी तिसरीत शिकते. लहान मुलगी आयुषी युकेजीत आहे. 10 जानेवारी रोजी कामावर जाताना आनंद यांनी आपल्या दोन्ही मुलींना शाळेत सोडले होते.
दुपारी 3 वाजता जेवणासाठी घरी आले त्यावेळी दोन्ही मुलींचे बॅग घरात होत्या. पत्नी व मुली त्याला दिसले नाहीत. बेपत्ता महिला व मुलींविषयी कोणाला माहिती मिळाल्यास 0831-2405238 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन उद्यमबाग पोलिसांनी केले आहे.