प्रतिनिधी /बेळगाव
मद्य व अमली पदार्थ सेवन करणाऱयांच्या संख्येत महिलांचीही वाढ झाली असून त्यांना व्यसनमुक्त करण्यासाठी निम्हान्स महिला विभागातील व्यसनमुक्ती केंद्रात दाखल करण्यात येत आहे. मद्य व अमली पदार्थ सेवन करणाऱया महिलांनी हा विभाग भरला आहे. त्यामुळे ही बाब अत्यंत गंभीर असून त्यांना मार्गदर्शन करण्याची गरज निर्माण झाली आहे.
सौम्य किंवा अल्पकाळासाठी लागलेले व्यसन असले तरीही स्त्रियांना या बाबतीत समाजाकडून मदत मिळणे कठीण झाले आहे. निम्हान्स केंद्राच्या व्यसनमुक्ती विभागाचे प्रमुख डॉ. विवेक बेनेगल यांच्या म्हणण्यानुसार केवळ आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यानंतरच मदत घेण्यासाठी अशा महिला निम्हान्सकडे येत आहेत. वास्तविक, यापूर्वीच त्यांना मार्गदर्शन झाले तर त्याचा निश्चितच फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नकारात्मक मानसिकतेतून बाहेर पडण्यासाठी स्त्रिया प्रामुख्याने मद्य पितात. मात्र, कधी कधी त्याचे अतिसेवन होत असल्यामुळे महिलांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे.
गरोदर स्त्रियांनी मद्यपान केल्यास अर्भकाला अल्कोहोल सिंड्रोम होण्याची शक्मयता असते किंवा जन्मलेले बाळ हे अभ्यासावर लक्ष केंद्रित करत नाही. ते असक्षम होऊ शकते, अशा समस्या निर्माण होतात. प्रख्यात बालरोगतज्ञ डॉ. विजयालक्ष्मी बाळेकुंद्री यांनी बाल्टिमोर येथे केलेल्या एका अभ्यासाद्वारे असे निदर्शनास आले आहे की, जीवनशैलीतील बदलांमुळे तसेच पाश्चात्य संस्कृतीमुळे स्त्रियांमध्ये धूम्रपान वाढले आहे. मात्र, धूम्रपानामुळे अर्भकाच्या हृदयाला हानी पोहोचू शकते, असेही अभ्यासात स्पष्ट दिसून आले आहे. सध्याच्या युगात करियरच्या नादात आजकाल विवाह उशिरा होतात. त्यामुळेही मुलेही उशिराने होतात. आनुवंशिक सिंड्रोम व डाऊनसिंड्रोम असणाऱया अर्भकात गेल्या काही वर्षांमध्ये अधिक भर पडली आहे. नवजात मुलांमधील व्यंग कमी करण्यासाठी महिलांनी फॉलिक ऍसिडच्या गोळय़ा घेण्यास सुरुवात करावी, असेही डॉ. विजयालक्ष्मी यांनी सांगितले आहे.