द इनक्रेडिबल्समधील इलास्टीगर्लशी तुलना
स्वतःच्या अनोख्या कानांमुळे एक महिला इंटरनेटवर व्हायरल झाली आहे. महिलेचे काम इतके मोठे आणि लवचिक आहेत, की ती छत्री पकडण्यासाठी किंवा सेल्फी स्टिक धरण्यासाठी हातांऐवजी कानांचाच वापर करते. टोकियोतील आयुमी ताकाडा नावाच्या या महिलेची तुलना ‘द इनक्रेडिबल्स’ चित्रपटातील ‘इलास्टीगर्ल’शी केली जाते.
आयुमीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून यात ती स्वतःच्या कानांच्या मदतीने एक सेल्फी स्टिक आणि छत्ती आणि एक पेन देखील अडकताना दिसून येते. लोक या अजब घटनेला पाहून दंग होत आहेत.
आयुमीचा कान 4.5 सेंटीमीटरपर्यंत फैलावू शकतो आणि एक सेल्फी स्टिकच्या हँडलला गोल लपेटू शकतो. एका व्हिडिओ फुटेजमध्ये 37 वर्षीय आयुमी ताकडा पावसात छत्री पकडण्यासाठी देखील या प्रतिभेचा वापर करत असल्याचे आणि यादरम्यान तिच्या दोन्ही हातांमध्ये शॉपिंग बॅग असल्याचे दिसून येते.
माझ्या कानाचे लोब (कानाचा खालील हिस्सा) लवचिक राहिले आहेत, प्राथमिक शाळेत असताना याची मला जाणीव झाली होती. असे आयुमीने सांगितले आहे. सेल्फी स्टिक, ब्रश, छत्री, सफाई उपकरणे आणि हँगर कानाने पकडू शकते असे तिचे म्हणणे आहे. या अजब प्रतिभेची धनी असलेल्या आयुमीच्या काही व्हिडिओंना 50 लाखांहून अधिक ह्यूज मिळाले आहेत. याचमुळे लोकांनी तिची तुलना कार्टून ‘द इनक्रेडिबल्सच्या ‘इलास्टीगर्ल’सोबत केली आहे.