सावंतवाडी : प्रतिनिधी
क्रीडा संकुल ओरोस येथे झालेल्या जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत 17 वर्षाखालील 73 किलो वजनी गटात नेमळे पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आठवीत शिकणारा विद्यार्थी कु रोहन रामचंद्र गावडे या विद्यार्थ्याने 70 कि वजन उचलून जिल्ह्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला या खेळाडूंची विभागीय स्पर्धे साठी निवड झाली आहे.
तसेच 17 वर्षाखालील 81 कि वजनी गटात नववीत शिकणारा विद्यार्थी कु सोहम राजन मडवळ या खेळाडूंने 65 कि वजन उचलून जिल्ह्यात तिसरा आला आहे. या विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक आर.के.राठोड यांचे मार्गदर्शन लाभले.यावेळी नेमळे पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आ. भी. राऊळ प्राचार्या कल्पना बोवलेकर,शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशप्राप्त विद्यार्थ्यांचे तसेच मार्गदर्शक शिक्षक आर. के. राठोड यांचे अभिनंदन केले आहे.