World Coconut Day 2022 : नारळाच्या पाण्याचे आरोग्याला अनेक फायदे आहेत. आपण आजारी पडलो की आवर्जून हे पाणी पितो. यामुळे आपल्याला तरतरी येते. नारळाच्या पाण्यात साखर आणि कॅलरीज कमी असतात. त्यात पोटॅशियम, सोडियम आणि मॅग्नेशियम सारखे इलेक्ट्रोलाइट्स देखील असतात. म्हणूनच व्यायाम केल्यानंतर नारळ पाणी हे सर्वोत्तम वर्कआउट पेय मानले जाते. याचा उपयोग आरोग्याला होतोच शिवाय त्वचेला तजेलेदार ठेवण्यास देखील मदत होते. असे एक ना अनेक याचे फायदे आहेत. जागतिक नारळ दिनानिमित्त आम्ही तुमच्यासाठी नारळपाणी पिण्याचे आरोग्याला कोणते फायदे होतात हे सांगणार आहोत.
१) कोलेस्ट्रॉल कमी करते
नारळाच्या पाण्यात ९४ टक्के भाग हा पाण्याचा असतो ज्याचा फायदा शरीरातील चरबी कमी आणि कोलेस्ट्रॉल मुक्त करण्यासाठी होतो. नारळाच्या पाण्यातील कोलेस्टेरॉल-कमी करण्याच्या गुणधर्माचे कारण म्हणजे त्यातील पोटॅशियम सामग्री जे खराब कोलेस्ट्रॉल कमी करते.
२) किडनी स्टोनपासून बचाव
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डायबिटीज अँड डायजेस्टिव्ह अँड किडनी डिसीजच्या मते, यूएसमधील ११ टक्के पुरुष आणि ६ टक्के महिलांना त्यांच्या आयुष्यात एकदा तरी मुतखडा होतो. ते टाळण्यासाठी हायड्रेटेड राहणे महत्वाचे आहे.यासाठी नारळाच्या पाण्याचे सेवन करा. पाणी प्यायल्याने आराम मिळतोच शिवाय सिस्टम ला फ्लश होण्यास मदत होते.
३) हृदयरोग्यांसाठी फायदेशीर
नारळाचे पाणी हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करू शकते. यामध्ये असलेले पोटॅशियम रक्तदाब कमी करण्यास मदत करू शकते. याव्यतिरिक्त, एका जुन्या अभ्यासात असे आढळून आले आहे की नारळाचे पाणी हृदयविकाराचा धोका कमी करण्यास मदत करू शकते.
४) मधुमेह असणाऱ्यांसाठी वरदानच
गोड पेयेऐवजी नारळाचे पाणी प्यायल्याने मधुमेह असलेल्या व्यक्तीच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवता येते. मात्र, साखरेच्या रुग्णांनी नारळाच्या पाण्याचे सेवन मर्यादित प्रमाणात करावे.
५) लठ्ठपणाची समस्या
जेव्हा गोड खाण्याची इच्छा होते तेव्हा नारळ पाणी सर्वोत्तम आहे. हे गोड पेयांएेवजी रिप्लेसमेंट म्हणून ट्राय करू शकता. यामुळे वजन कमी होण्यास मदत होतो. वजन मध्यम राखण्यास देखील मदत होते.
६) उच्च रक्तदाबावर उपयुक्त
पोटॅशियम समृद्ध असल्याने, नारळाचे पाणी रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करू शकते. संशोधनात असे दिसून आले आहे की पोटॅशियम समृद्ध आहार रक्तदाब नियंत्रित करून आणि स्ट्रोकपासून संरक्षण करून हृदयाच्या आरोग्यास मदत करू शकतात.
७) अॅसिडिटीपासून आराम मिळतो
अॅसिड रिफ्लक्स किंवा जीईआरडी असलेल्या लोकांसाठी नारळाचे पाणी हा आणखी एक उत्तम पर्याय असू शकतो. हे पेय पोटॅशियम सारख्या उपयुक्त इलेक्ट्रोलाइट्सचा चांगला स्रोत आहे. हे शरीरातील पीएच संतुलन राखण्यास मदत करते.
Previous Articleदीड दिवसांच्या बाप्पांना भक्तिभावात निरोप
Next Article पारगाव येथे विहिरीत बुडून युवकाचा मृत्यू
Abhijeet Khandekar
Meet Abhijeet Khandekar : a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. With a Master's degree in Journalism from Shivaji University, Abhijeet specializes in political news, entertainment, and local content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives. Connect with Abhijeet for collaborations and captivating content that informs and entertains.