बेळगाव : बेळगाव प्रेस ओनर्स असोसिएशन यांच्यावतीने शुक्रवार दि. 24 रोजी जागतिक मुद्रण दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रेस ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष श्रीधर (बापू) जाधव होते. प्रारंभी त्यांच्याच हस्ते जोहान्स गुटेनबर्ग यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. उपस्थित मुद्रक बांधवांचे स्वागत उपाध्यक्ष राजेंद्र भातकांडे यांनी केले. यावेळी कला आर्ट्सचे विलास सावगावकर यांना स्क्रीन प्रिंटिंग व्हॅल्यू एडिशन स्क्रीन प्रिंटिंगमध्ये द्वितीय क्रमांक मिळाला. त्याबद्दल त्यांचा अध्यक्ष व मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. जोहान्स गुटेनबर्ग यांनी टाईपची निर्मिती केली गुटेनबर्ग यांनी जगातील पहिले प्रिंटिंग प्रेस सरू केले. जगाला दिलेली ही क्रांतिकारक भेट होती म्हणूनच आपण 24 फेब्रुवारी हा गुटेनबर्ग यांच्या स्मृतिदिनानिमित्त मुद्रण दिन म्हणून साजरा करीत असतो. मुद्रण कलेचा शोध हा मानवी जीवनातील महत्त्वपूर्ण व क्रांतिकारक शोध आहे. जोहान्स गुटेनबर्ग यांनी आम्हा मुद्रण व्यावसायिकांना हा व्यवसाय उपलब्ध करून दिलेला आहे. त्यामुळे आम्ही सर्व मुद्रक बांधवांनी संघटित राहून मुद्रण व्यवसायासाठी त्याच्या प्रगतीसाठी प्रयत्न करण्याची गरज आहे, असे मनोगत अध्यक्ष श्रीधर (बापू) जाधव यांनी व्यक्त केले. मुद्रक बांधवांसाठी सतीश जाधव व नंदू देशपांडे यांनी अल्पोपाहाराची व्यवस्था केली होती. त्याबद्दल या दोघांचाही पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी उपसेव्रेटरी संतोष होर्टिकर, अजित कोळेकर, रघुनाथ राणे, राजेंद्र कुलकर्णी, पांडुरंग बळी आदींसह बेळगावमधील मुद्रण बांधव उपस्थित होते. सचिव शाम मांगले यांनी आभार मानले.
Previous Articleलोकमान्य सोसायटीची लोकमान्य नारी सन्मान ठेव योजना सुरू
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.