सर्वात मोठय़ा दिव्याचे प्रज्वलन केल्याने गिनिज बुकमध्ये नोंद
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
जगातील आतापर्यंतचा सर्वात मोठा दिवा प्रज्वलित करण्याचा विक्रम भारतात घडविण्यात आला आहे. या विक्रमाची नोंद ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्’ मध्ये करण्यात आली आहे. पंजाब राज्याच्या मोहाली येथे या दिव्याची निर्मिती आणि प्रज्वलन करण्यात आले. दिवाळीआधीच पडलेल्या या विक्रमी प्रकाश प्रयोगाचे कौतुक सर्वत्र होत आहे. या प्रज्वलनात 10,000 पेक्षा अधिक नागरीकांचे योगदान आहे. या दीपाचे प्रज्वलन करण्यासाठी शुद्ध तेलाचा उपयोग करण्यात आला. निवृत्त सेनाधिकारी लेफ्टनंट जनरल के. जे. सिंह यांच्या हस्ते हे दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी गिनीज बुकच्या अधिकाऱयांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
हा विश्वविक्रम ‘हीरो होम्स’ या संस्थेच्या पुढाकाराने करण्यात आला आहे. या संस्थेच्या परिसरात जगातील सर्वात मोठय़ा दिव्याची निर्मिती करण्यात आली. धनत्रयोदशीदिवशी त्याचे प्रज्वलन करण्यात आले. या दिव्याची निर्मिती एक सहस्र किलो पोलादापासून करण्यात आली आहे. दिव्याची लांबी 3.37 मीटर इतकी असून विश्वशांती आणि मानवतावादाचा प्रसार करण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला होता, असे या उपक्रमाच्या आयोजकांनी स्पष्ट केले.
3,560 लीटर तेल
या दिव्याचे प्रज्वलन करण्यासाठी प्रथम त्यात 3,560 लीटर तेल भरण्यात ओ होते. हे तेल विविध प्रकारच्या बियांपासून गाळण्यात आले होते. हे तेल खनिज तेल नव्हते तर जैविक होते. इतक्या मोठय़ा प्रमाणात तेल जमा करणे हे एका व्यक्तीच्या क्षमतेतील काम नव्हते. यासाठी चार हजार निवासी नागरीक आणि 10 हजार इतर नागरीकांचे साहाय्य घेण्यात आले होते.
‘गिनीज’ अधिकाऱयांची उपस्थिती
या विश्वविक्रमी दिव्याचे परीक्षण आणि पडताळणी करण्यासाठी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्च्या अनेक अधिकाऱयांनी प्रत्यक्ष उपस्थिती लावली होती. त्यांच्या पडताळणीनंतर या विक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस् मध्ये करण्याचा निर्णय या अधिकाऱयांनी घेतला. अशा प्रकारे हा दिवा विक्रमी ठरला.
दीपप्रज्वलन विश्वविक्रम आकडय़ांमध्ये
ड दिव्याचे वजन ः 1,000 किलोहून अधिक
ड दिव्याची लांबी ः 3.7 मीटर
ड प्रज्वलनासाठी तेल ः 3,560 किलो
ड योगदानकर्ते नागरीक ः 14,000 हून अधिक
ड उपस्थिती ः गिनीजचे अधिकारी, मान्यवर