ऑनलाईन टीम / बीजिंग :
कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना काँग्रेसची तीन दशकं जुनी राजवट मोडीत काढत शी जिनपिंग (Xi Jinping) यांची तिसऱ्यांदा चीनच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
चीनमध्ये 1980 नंतर सर्वोच्च पदावर 10 वर्षांच्या कार्यकाळाचा नियम करण्यात आला होता. मात्र, जिनपिंग यांना आणखी पाच वर्षे सत्तेवर ठेवण्यासाठी हा नियम बाजूला ठेवण्यात आला. नुकत्याच झालेल्या पक्षाच्या 20 व्या अधिवेशनानंतर जिनपिंग यांची पुन्हा पक्षाच्या सरचिटणीसपदी निवड झाली आहे. चीनमध्ये या पदासाठी निवडलेला नेता देशाचा राष्ट्राध्यक्ष असतो आणि पीपल्स लिबरेशन आर्मी चा कमांडर देखील असतो. कारण चीनमध्ये सत्तेत असलेल्या पक्षच चीनी सैन्याचेही नेतृत्व करतो.
अधिक वाचा : ISRO ने रचला इतिहास; बाहुबली ‘LVM-3’चे व्यावसायिक प्रक्षेपण यशस्वी
आठवडाभर चाललेल्या या 20 व्या राष्ट्रीय काँग्रेसमध्ये जिनपिंग यांनी तिसऱयांदा राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. यावेळी पक्षाच्या 205 सदस्यांची पक्षाची मध्यवर्ती समितीही जाहीर झाली. पक्षानं या समितीतून प्रधानमंत्री ली केकियांग, उपप्रधानमंत्री हान झेंग यांच्यासह इतर दोघांना काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं यांना सरकारमध्ये महत्त्वाचं पद यापुढं भुषवता येणार नाही. कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना काँग्रेसचे संस्थापक माओ झेडोंग यांच्यानंतर तिसऱ्यांदा सत्तेवर असणारे जिनपिंग हे पहिले चीनी नेते ठरले आहेत. माओ त्सो तुंग यांनी तीन दशके चीनवर राज्य केले होते.