पुढील सुनावणी होणार 30 जून रोजी
प्रतिनिधी /बेळगाव
येळ्ळूरच्या वेशीतील ‘महाराष्ट्र राज्य येळ्ळूर’ हा फलक हटविल्यानंतर येळ्ळूरच्या निष्पाप जनतेला मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्यांच्यावरच गुन्हे दाखल करण्यात आले. त्या खटल्याची सुनावणी बुधवारी होती. मात्र पंच व साक्षीदार हजर झाले नाहीत. त्यामुळे सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून पुढील सुनावणी दि. 30 जून रोजी होणार आहे.
येथील जेएमएफसी द्वितीय न्यायालयात खटल्याची सुनावणी सुरू आहे. गेल्या आठ वर्षांपासून या खटल्याची सुनावणी सुरू आहे. मात्र साक्षीदार, पंच, पोलीस अधिकारी गैरहजर रहात आहेत. त्यामुळे येळ्ळूरच्या निष्पाप कार्यकर्त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे नाराजी व्यक्त होत आहे.