रत्नागिरी प्रतिनिधी
गणपतीपुळे नजीकच्या भंडारपुळे समुद्रकिनारी फिरण्यासाठी आलेल्या पनवेल येथील तरूणाचा समुद्रात बुडून मृत्यू झाला. सागर देवदास शिर्के (33, ऱा सुकापूर नवीन पनवेल) असे मृताचे नाव आह़े या घटनेची नोंद जयगड सागरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आह़े.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सागर हा पनवेल येथील रहिवासी असून तो भंडारपुळे येथे फिरण्यासाठी आला होत़ा तो समुद्राच्या पाण्यात उतरला होत़ा यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने सागर हा पाण्यात ओढला गेल़ा यावेळी पाण्यात बुडत असलेल्या सागर याला स्थानिकांनी पाण्यातून बाहेर काढत उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र खंडाळा येथे दाखल केल़े यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सागर याला तपासून मृत घोषीत केली.