एलपीजी सिलिंडरच्या दरवाढीबाबत नाराजी व्यक्त
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
एलपीजी सिलिंडरच्या दरवाढीविरोधात दिल्लीत भारतीय युवक काँग्रेसने निदर्शने केली. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या घराबाहेर शनिवारी दुपारच्या सुमारास आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी आंदोलकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. यावेळी निदर्शकांनी हातात रिकामे सिलिंडर आणि गॅस सिलिंडरच्या आकाराचे फलकही घेतले होते. या फलकांवर विविध घोषणा लिहिलेल्या होत्या. दुसरीकडे, पश्चिम बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसनेही इंधनाच्या वाढलेल्या दरांबाबत केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. पश्चिम बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसनेही पेट्रोलियम पदार्थांच्या वाढलेल्या किमतीवरून केंद्र सरकारवर हल्लाबोल केला.