ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी (Asif Ali Zardari) यांनी माझ्या हत्येचा कट रचला होता. त्यासाठी त्यांनी दहशतवाद्यांनाही पैसे दिले होते, असा गंभीर आरोप तेहरीक-ए-इन्साफ पक्षाचे अध्यक्ष इम्रान खान (Imran Khan) यांनी केला आहे. पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनने यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध केले आहे.
इम्रान खान यांनी म्हटले आहे की, माजी राष्ट्राध्यक्ष आसिफ झरदारी यांच्या सांगण्यानुसार चार लोक माझ्या हत्येचा कट रचत आहेत. पहिला प्लॅन उघड झाल्यानंतर माझ्या हत्येचा प्लॅन ए कधीच अंमलात आणला गेला नाही, तर दुसरा प्रयत्न वजिराबादमध्ये झाला. आता सी प्लॅन तयार करण्यात आला आहे. हत्येचा प्लॅन करणाऱ्यांची नावेही माझ्या रेकॉर्डिंगमध्ये आहेत. योग्य वेळी मी ती प्रसिद्ध करेन. मी आता या गोष्टींबद्दल बोलत आहे कारण, माझ्यावर पुन्हा हल्ला झाला तर हल्लेखोरांबद्दल तुम्हाला माहिती असावी.
अधिक वाचा : प्राचार्यांना मारहाण करणं भोवलं; आ. बांगर यांच्यासह 30 ते 40 जणांवर गुन्हा