जानेवारीत होणार कुस्ती मैदान
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
मध्यवर्ती कुस्तीगीर संघटना बेळगाव यांची बैठक रविवार दि. 31 रोजी पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पै. मारुती घाडी होते.
सदर बैठक दहावा क्रॉस ओमश्री हॉल शास्त्राrनगर येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत नूतन कार्यकारिणीची नियुक्ती केली गेली. तसेच 9 जानेवारी रोजी कुस्ती मैदान करण्याचे एकमताने ठरविण्यात आले. नूतन कार्यकारणी अध्यक्षपदी मारुती घाडी, उपाध्यक्ष नवरतनसिंग पनवर, सेक्रेटरी वसंत जोतीबा सोनोलकर, खजिनदार पोमानी कुन्नुरकर, संचालक संतोष होंगल, मनोज बिर्जे, मल्लाप्पा हिंडलगेकर, विनोद चौगुले, संजय वाजंत्री, कार्याध्यक्ष श्रीकांत नाईक, सल्लागार किरण पाटील, हिरालाल चव्हाण, वैभव खाडे, अशोक हलगेकर, बळाराम पाटील, ऍड. अशोक हनमिनहाळ, सुरज घाडी, शटूप्पा बेळगावकर, हणमंत गुरव, हरिचंद्र कन्नुरकर, नरहरी माळवी, जयवंत दंडगल, अरुण मोकाशी यांची निवड केली गेली. संतोष होंगल यानी आभार मानले.