ऑनलाईन टीम / मुंबई :
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इकबाल कासकरला मुंबई नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (NCB) ताब्यात घेतले आहे. अंमली पदार्थ तस्करी प्रकरणी एनसीबीकडून ही कारवाई करण्यात आली आहे. गेल्या वर्षभरापासून मुंबईतील ड्रग्ज रॅकेट आणि त्यामागे असणाऱ्या अनेक मोठ्या नावांची चौकशी एनसीबीकडून केली जात आहे. त्यानंतर आज एनसीबीने इकबाल कासकरला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी होणार असल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, नुकतेच एनसीबीने चरसचे दोन कंसाइनमेंट पकडले होते, जे पंजाबचे लोकं काश्मीरहून मुंबईला दुचाकीवरून आणत होते. याप्रकरणात जवळपास 25 किलोग्रॅम चरस जप्त केले गेले होते.
याच प्रकरणातील पुढील तपासादरम्यान एनसीबीला अंडरवर्ल्डचे धागेदोरे मिळाले. यामुळे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला एनसीबीने ताब्यात घेता आले आहे. काही वेळातच इक्बालला एनसीबीच्या मुंबई ऑफिसमध्ये आणले जाणार आहे