वृत्तसंस्था / पोर्ट ब्लेअर
अंदमान आणि निकोबार बेटसमुहामध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. नॅशनल सेंटर फॉर सीस्मोलॉजीनुसार अंदमान आणि निकोबारमध्ये डिगलीपूरपासून 137 किलोमीटर उत्तरेसह हे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. शनिवारी सकाळी 8.50 वाजता हा भूकंपाचा धक्का बसला आहे. बेटसमुहात या भूकंपाची तीव्रता 4.5 राहिली. पण या भूकंपात कुठल्याही प्रकारच्या नुकसानीचे वृत्त नाही. तत्पूर्वी उत्तराखंडमध्येही शनिवारी भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.
पहाटे सुमारे 5 वाजून 58 मिनिटांनी उत्तराखंडमध्ये भूकंपाचा धक्का बसला आहे. भूकंपाचे केंद्र चमोली जिल्हय़ातील जोशीमठ येथे होते. हे भूकंपाचे केंद्र भूगर्भात 5 किलोमीटर खोलवर होते. तसेच याची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.7 नोंद करण्यात आली आहे.