प्रतिनिधी / कोल्हापूर
चार दशकांपूर्वी अंबाबाई मंदिरात पावसाच्या पाण्याच्या गळती थांबविण्यासाठी मंदिराच्या पाचही शिखरांच्या लगतच्या भागात सातत्याने सिमेंटचा कोबा करण्यात आला. सध्या या कोब्याचे मुंबईतील स्टकवेल कंपनीकडून स्ट्रक्चरल ऑडीट केले जात आहे. त्याच्याच एक भाग म्हणून मंदिराच्या आतील व बाहेरील भागाची आधुनिक बनावटीच्या रडार मशिनद्वारे तपासणीही केली आहे. यात शिखरांलगचा कोबा तब्बल दीड मीटर उंचीचा असून त्याचे वजन तब्बल 1 हजार टन असल्याचे दिसून आले. भविष्यात या बोजाचा मंदिराच्या एकुणच ठेवणीवर परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे लवकरच हा संपुर्ण कोबा हटवून मंदिरात पावसाच्या पाण्याची गळती होऊ नये, आधुनिक पद्धतीचे वॉटर प्रुफींग केले जाणार असल्याची माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती अध्यक्ष महेश जाधव यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत दिली.
महेश जाधव, अध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती (final / full byte) मंदिरातील जुन्या ढाच्याच्या गरुड मंडपाला मुळ स्वरूपात आणले जाणार आहे. या मंडपाला दगडी फरशी आहे. तिच्यावर मोझॅक फरशी बसविल्या गेल्याने गरुड मंडपातील मुळच्या फरशांचे स्वरूप झाकले गेले. आता लवकरच मोझॅक फरशी हटवून दगडी फरशी उजेडात आणली जाईल, असेही जाधव यांनी यावेळी सांगितले. तसेच ह्या कामामुळे मंदिराचे सौन्दर्य आणखीनच वाढणार आहे याविषयी अधिक माहिती देत आहेत पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे इंजिनिअर सुदेश देशपांडे सुदेश देशपांडे, इंजिनिअर, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे (full byte)
गेल्या तीन वर्षात देवस्थान समितीने अंबाबाई मंदिरासह, वाडीरत्नागिरीवरील जोतिबा मंदिर, नृसिंहवाडी दत्त मंदिर येथे सुरू असलेल्या विकासकामांचीही त्यांनी यावेळी माहिती दिली. ते म्हणाले, अंबाबाई मंदिर, घाटी दरवाजालगतचा 6800 चौरस फुटातील मनकर्णिका कुंड खुला करण्याचे काम सहा महिन्यांपासून सुरू आहे. दरम्यानच्या काळात 20 फुटांपर्यंतचे खोदकाम पूर्ण झाले असून त्यात ऐतिहासिक ठेवा उजेडात आला आहे. आता कुंडाच्या जागेवरील हारांची दुकाने हटवून 7 फुटांपर्यंतची जागा ताब्यात घेण्याचे काम सध्या सुरू आहे. कुंडाच्या जागेवरील झाडे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाच्या परवानगीने काढली असून त्याच्या बदल्यात टेंबलाई टेकडीवर 100 झाडे लावली जाणार आहेत. पुढील तीन महिन्यात कुंड भाविकांसाठी खुला होईल, असेही समितीने नियोजन केले आहे.
पाणी गळती रोखण्यासाठी 4 दशकांपूर्वी मंदिरावर केला होता सिमेंटचा कोबा तब्बल दीड मीटर उंचीचा असून त्याचे वजन तब्बल 1 हजार टन असल्याचे दिसून आले मंदिरातील सर्व संगमरवरी फरशा हटवून दगडी फरशी उजेडात आणणार गरुड मंडपालाही मुळ स्वरूप येणार आधुनिक पद्धतीचे वॉटर प्रुफींग करणार देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव यांची माहिती मनकर्णिका कुंड तीन महिन्यात कुंड भाविकांसाठी खुला होईल.