मुंबई
शेअर बाजारात सिमेंट क्षेत्रातील कंपनी अंबुजा सिमेंटस्च्या समभागाचे भाव शुक्रवारी 5 टक्के इतके घसरलेले दिसले. कंपनीचा भाव 339 रुपयांवर व्यवहार करत होता. कंपनीने आपल्या डिसेंबर तिमाहीतील नफ्याची आकडेवारी सादर केली आहे. ज्यात कंपनीने निव्वळ नफ्यात 55 टक्के घसरण नोंदवली असून 430 कोटी रुपयांचा नफा डिसेंबर तिमाहीत प्राप्त केला आहे. या नफेआकडेवारीचा प्रभाव समभागाच्या भावावर दिसला. याच काळात 2 टक्के वाढीसह कंपनीने 7 हजार 625 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केला आहे.