बेळगाव : आज अक्षयतृतिया. बेळगावमध्ये दरवषी या दिवशी सोन्या, चांदीची व इतर वस्तूंची आवर्जुन खरेदी होते. परंतु यंदा बेळगावकर या खरेदीला मुकणार आहेत. त्यामुळे सराफी पेढय़ांही सुन्यासुन्या झाल्या आहेत. सध्या प्रशासनाने सकाळी 6 ते 10 हा अवधी खरेदीसाठी दिला आहे. परंतु अक्षय तृतियेदिवशी म्हणजेच दि. 14 मे रोजी सकाळी सणाची खरेदी करण्याचे शक्मय नसल्याने गुरूवारी बाजारपेठेत गर्दी झाली. भाजी खरेदीबरोबरच लोकांनी आंब्याची पाने, पन्हे आणि कोशिंबिरीसाठी कैऱया, पूजेसाठी लाल रंगाचे कापड खरेदी केले. या कपडय़ामध्ये कवडय़ा घालून ते बांधून त्याची पूजा केली जाते. तसेच प्रामुख्याने अन्नपूर्णेची पूजा केली जाते. जाचा क्षय होत नाही ते अक्षय. त्यामुळे त्या दिवशी घरोघरी अन्नपूर्णेची पूजा करुन समृद्धीसाठी प्रार्थना केली जाते. या दिवशी प्रामुख्याने सोने, चांदीची खरेदी केली जाते. दिवाळी प्रमाणेच अक्षय तृतियेला सुध्दा महत्त्व असून खरेदीवर भर दिला जातो. मात्र यंदा खरेदीला मर्यादा आल्या आहेत. या दिवशी बासरीचे पूजनही केले जाते. शिवाय काही घरांमध्ये पाणी, माठ, तांदूळ, मीठ, हिरव्या भाज्या, साखर, सरबत अशा वस्तू ब्राह्मणांना दान करण्याची प्रथा आहे.
अक्षय तृतियेचा मुहूर्त आज पहाटेपासून
यंदा अक्षय तृतियेचा मुहूर्त 14 मे रोजी पहाटे 5.38 पासून 15 मे रोजी सकाळी 7.59 मिनिटांपर्यंत आहे.