युरोपीय देशांसमोर नवे संकट उभे राहणार
वृत्तसंस्था /अंकारा
तुर्कस्तान आणि अजरबैजान नवी सैन्य संघटना निर्माण करण्याचा विचार करत आहेत. दोन्ही देश सैन्य सहकार्याच्या क्षेत्रात संयुक्त कार्यक्रम आयोजित करण्याच्या योजनेवर काम करत आहेत. तुर्कस्तान आणि अजरबैजानने संयुक्त सैन्य आघाडी निर्माण केल्यास ती ग्रीस, आर्मेनिया, सायप्रस समवेत अनेक देशांसाठी धोकादायक ठरणार आहे.
अजरबैजानमध्ये तीन नव्या विमानतळांची निर्मिती तुर्कस्तान करणार आहे. या विमाननतळांच्या मदतीने तुर्कस्तान मध्य आशियात सैन्य सामर्थ्य वाढवू पाहत आहे. मागील वर्षी सप्टेंबरमध्ये अजरबैजान आणि आर्मेनिया यांच्यात नागोर्नो-काराबाखमध्ये युद्ध झाले होते. या युद्धावेळी तुर्कस्तानने अजरबैजानला मोठी मदत केली होती. तुर्कस्तानच्या लढाऊ विमानांनी नागोर्नो-काराबाख क्षेत्रात आर्मेनियन सैन्यावर बॉम्बफेक केल्याचे बोलले गेले होते. तुर्कस्तान, पाक आणि अजरबैजानमधील नेते तिन्ही देशांदरम्यान संबंध मजबूत करण्यासाठी चर्चा करत आहेत.