ऑनलाईन टीम / पुणे :
पुणे शहर आणि जिल्ह्यात काल दुपार पासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. दरम्यान, अतिवृष्टी आणि चक्रीवादळामुळे पुणे विद्यापीठाच्या आजच्या नियोजित सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत.

विद्यापीठाच्या संकेत स्थळावर याबाबत माहिती देण्यात आली आहे. यामध्ये म्हटले आहे की, राज्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे, त्यामुळे 15 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ऑनलाईन आणि ऑफलाईन परीक्षा रद्द केल्या असून लवकरच सुधारीत वेळापत्रक जाहीर केले जाईल असे विद्यापीठाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.