आकार इतका मोठा की घालतो 5 इंचाची अंगठी
सनी देओलचा ‘ढाई किलो का हाथ’ हा प्रसिद्ध डायलॉग सर्वांनीच ऐकला असेल. तसेच प्रसिद्ध कार्टून पॉपोयबद्दलही तुम्हाला माहित असेल, ज्याचा हात त्याच्या शरीरापेक्षा मोठा असतो. अशा गोष्टी केवळ चित्रपट किंवा कार्टून्समध्ये असतील असे वाटत असेल तर तुम्ही चुकताय.
अमेरिकेतील एका व्यक्तीला सनी देओलचा डायलॉग आणि पॉपोयचा आकार मॅच करतो. याचा हात बघून कुणीच चकित होऊन जातो, कारण त्याचे हात सर्वसामान्य माणसांच्या हातांच्या तुलनेत खूपच मोठे आहेत. मिनेसाटा येथे राहणारा जेफ डॅबे अत्यंत अनोखा इसम आहे. जेफचे हात इतरांच्या तुलनेत एवढे मोठे आहेत की ते पाहून कुणीही दंग होऊन जाईल. 48 वर्षीय जेफ स्वतःच्या हातांमुळे अत्यंत लोकप्रिय ठरला आहे. फ्लोरिडाच्या इंटरनॅशनल फेडरेश ऑफ आर्म रेस्लिंग ग्रँडमास्टर टूर्नामेंटमध्ये त्याने अनेकवेळा विजय मिळविला आहे.

जेफच्या हातांचा परिघ 19.30 इंच आहे. त्याच्या अंगठीचा आकार 5 इंच इतका आहे. तो स्वतःच्या हातात दोन बास्केटबॉल एकाचवेळी पकडू शकतो इतके त्याचे हात मोठे आहेत.
डॉक्टरांनाही कळले नाही कराण
डॉक्टरांनी माझ्या सर्व चाचण्या केल्या तरीही त्यांना माझ्या मोठय़ा हातांमागील कारण समजू शकले नाही. जाइजँटिजम किंवा एलिफँटिएसिसचा विकार आहे का हे त्यांनी पाहिले होते, परंतु प्रत्येकवेळी रिपोर्ट नॉर्मल आला. माझे हात अखेर इतके मोठे कसे झाले हे त्यांनाही शोधून काढता आले नाही. मोठे हात असल्याने माझे नुकसान होत नाही. सर्वसामान्य लोकांप्रमाणे मी प्रत्येक गोष्ट करू शकतो. केवळ एकच समस्या आहे ती म्हणजे मला वापरता येतील असे हातमोजे मिळत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.