प्रतिनिधी /बेंगळूर
मुळच्या बांगलादेशमधील 23 वर्षीय युवतीवर सामूहिक अत्याचार करणाऱया 12 आरोपींविरुद्ध 1,019 पानी चार्जशीट (दोषारोपपत्र) दाखल करण्यात आले आहे. अत्याचार प्रकरणी बेंगळूरच्या राममूर्तीनगर पोलिसांनी 12 आरोपींची चौकशी पूर्ण केली असून बेंगळूरच्या प्रथम एसीएमएम न्यायालयात चार्जशीट दाखल केले आहे, अशी माहिती डीसीपी शरणप्पा यांनी दिली.
सदर प्रकरणात 12 जणांवर अत्याचाराचा आरोप आहे. तर दोन युवतींवर बेकादेशीरपणे भारतात घुसखोरी केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी 30 हून अधिक साक्षी नोंदविण्यात आल्या आहेत. आरोपींच्या मोबाईलमधील अत्याचाराचे व्हिडीओ, फोन कॉल्स, फोरेन्सिक लॅबचा रिपोर्ट, आरोपींचे डीएनएचे नमुने यांचा उल्लेखही चार्जशीटमध्ये करण्यात आला आहे.