प्रतिनिधी / पाटगाव
अथणी शुगर्स भुदरगड युनिटच्यावतीने साल २०१९-२०मध्ये कारखान्याकडे गाळप झालेल्या उसाचे अंतिम बिल २८०० रुपये प्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले असल्याची माहिती कारखान्याचे एक्झिक्युटिव डायरेक्टर योगेश पाटील यांनी दिली.
२०१९ मध्ये आलेला महापूर व या परिसरात अनेक वेळा झालेली अतिवृष्टीमुळे उसाच्या वजनात कमालीची घट झाली होती. १९-२०मध्ये भुदरगड युनिटच्यावतीने २३६७२२ मेट्रिक टन ऊस गाळप करून १२.१ % सरासरीने २८४३६७ क्विंटल साखरेची निर्मिती करण्यात आली होती.कारखाना गाळपाच्या सुरवातीस परिसरातील शेतकरी,कारखाना प्रशासन व संघटना यांच्या मध्ये ठरले प्रमाणे प्रति टणास २८०० रुपये प्रमाणे कारखान्याकडे गाळपास आलेल्या सर्व उसाचे बिल शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केले असून तोडणी व वाहतुकीचे देखील सर्व पैसे वाहनधारकांना दिले आहेत.पुढील ववर्षाच्या हंगामा करिता नवीन वाहन व तोडणी यंत्रणा करार चालू असून वाहन धारकांनी आपले करार करून घ्यावेत व शेतकऱ्यांनी देखील जास्तीजास्त उसाची नोंद करून घ्यावी तसेच पुढील वर्षी चार लाख ऊस गाळपाचे उद्धिष्ट असल्याचे योगेश पाटील यांनी सांगितले.
यावेळी चीफ इंजिनिअर नामदेव भोसले,मुख्य शेती अधिकारी पी.जी.पी.व्ही.खटावकर,बाबासाहेब देसाई,जमीर मकान्दार, कन्हैया गोरे,सुनील घुगरे, सतीश पाटील,संताजी देसाई,जगदीश घोरपडे आदी उपस्थित होते.