प्रतिनिधी / कोल्हापूर
हदयविकाराशी निगडीत रूग्णांत ओपन हार्ट सर्जरीला आता मिनिमली इव्हेसिव्ह कार्डिऍक (एमआयसीएस) सर्जरी पर्याय उपलब्ध झाला आहे. येथील अथायु हॉस्पिटलमध्ये एमआयसीएस' तंत्राने तीन शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या आहेत. अशा शस्त्रक्रियेनंतर चौथ्या दिवशी रूग्ण कामावर जाऊ शकतो. प. महाराष्ट्रात कमीत कमी छेदातून
एमआयसीएस’द्वारे हृदय शस्त्रक्रिया अथायु'मध्ये उपलब्ध आहे, अशी माहिती कार्डियॅक सर्जन डॉ. अमोल भोजे यांनी दिली. येथील प्रेस क्लबमध्ये मंगळवारी
एमआयसीएस’ तंत्राविषयी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी अथायु हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सौरभ गांधी, चेअरमन अनंत सरनाईक, डॉ. बसवराज कडलगे, डॉ. गौरी देशपांडे, रूग्ण संजीव देशपांडे, योगिता नामदे आदी उपस्थित हेते.
डॉ. भोजे म्हणाले, हृदयरोग म्हटले की बायपास सर्जरी आली, पण हॉर्ट ब्लॉकेजीस असलेल्या रूग्णांसाठी ऍजिओप्लास्टीद्वारे स्टेंट बसवले जातात. पण त्यानंतर काही काळांनी स्टेंट निघतात, अशावेळी हृदय शस्त्रक्रिया करावी लागते. पण ही शस्त्रक्रिया मिनिमली इव्हेसिव्ह कार्डिऍक' (एमआयसीएस) तंत्राने कमीत कमी छेद टाकून केली जाते. त्यामुळे कमी वेळ, कमी रक्तस्राव अन् रूग्ण लवकर बरा होतो. अथायु हॉस्पिटलमध्ये फक्त या तंत्राद्वारे शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. हृदय विकारग्रस्तांमध्ये स्टेंट ऍजिओप्लास्टी लोकप्रिय आहे. यात शस्त्रक्रिया केली जात नाही, पण स्टेंटमुळे भविष्यात आणखी त्रास होण्याची शक्यता असते. त्यातून ओपन हार्ट सर्जरी आणि ऍजिओप्लास्टीला पर्यायी असे मिनिमली इव्हेसिव्ह कार्डिऍक (एमआयसीएस) तंत्र उपलब्ध झाले आहे. यात अवघ्या एक ते दीड इंच छिद्राद्वारे हृदय शस्त्रक्रिया केली जाते, त्यामुळे कमी त्रास, कमी जखम, कमी रक्तस्राव व संसर्गाचा धोकाही कमी झाल्याने रूग्ण 4 दिवसांत पुर्णपणे बरा होत आहे.
एमआयसीएस हे उच्च तंत्रज्ञान आहे, ते देशांत निवडक शहरात उपलब्ध आहे. त्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान व तज्ञ डॉक्टर लागतात. अथायु हॉस्पिटलमध्ये हे सर्व उपलब्ध आहे. या तंत्राद्वारे 3 शस्त्रक्रिया येथे यशस्वी झाल्या आहेत. 3 ब्लॉकेज असलेल्या रूग्णावरही येथे शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. हृदयविकारग्रस्त महिलांमध्ये कॉस्मेटिक सर्जरीला प्राधान्य होते, आता अशा महिलांवर एमआयसीएस तंत्राद्वारे शस्त्रक्रिया केली आहे.
अथायु’मध्ये कार्डिंयॅक, सुपर स्पेशालिटी ओटी, कॅथॅलॅब, ट्रामा, मायनर ऑपरेशन थिएटर सुविधा असल्याने हृदय रूग्णांसाठी परीपुर्ण उपचार उपलब्ध झाल्याची माहिती अथायु हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सौरभ गांधी, चेअरमन अनंत सरनाईक यांनी दिली.