मुंबई \ ऑनलाईन टीम
सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला यांनी आपल्याला धमक्या मिळत असल्याचा खुलासा केला होता. सध्या देशात यावरून चांगलीच खळबळ माजली आहे. अदर पूनावाला यांनी कोणाचंही नाव घेतलेलं नसून हे धमकी देणारे नेमके कोण यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोपाची मालिका सुरू झाली आहे. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्रातून अशा प्रकारच्या धमक्या त्यांना कोणीही देणार नाही कारण महाराष्ट्राची ती परंपराच नाही अशी प्रितिक्रिया दिली आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
संजय राऊत म्हणाले की, आदर पूनावाला यांनी धमकीबजद्दल काही वक्तव्य केले असेल तर निश्चितच प्रकरण गंभीर आहे. खरं म्हणजे महाराष्ट्रातून अशा प्रकारच्या धमक्या त्यांना कोणीही देणार नाही. महाराष्ट्राची ती परंपराच नाही. किंबहुना महाराष्ट्राला सुद्धा या गोष्टीचा गर्व राहील की देशाची आरोग्यविषयक सुरक्षा निर्माण करणारे किंवा देशाला आरोग्यविषयक कवच-कुंडल देणारी जी लस आहे त्याची निर्मिती महाराष्ट्रात होते आहे.ही एक राष्ट्रभक्तीची भावना महाराष्ट्रात कायम राहील. त्यामुळे महाराष्ट्रातील कोणतेही नेते, राजकीय पक्ष अशा प्रकारचा धमक्या देणार नाही. जर कोणी असे करत असेल तर केंद्र आणि राज्य सरकाने याचा खोलवर तपास करावा, असे देखील म्हणाले.
अदर पूनावाला यांची सुरक्षा करणं सर्वांची जबाबदारी आहे. ते देशासाठी काम करत असून त्यांची सुरक्षा करणं आपलं कर्तव्य असल्याचे संजय राऊत यावेळी म्हणाले.
Trending
- अर्जेन्टिनाला 3-0 ने नमवून भारतीय संघ अव्वल स्थानी
- छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेची विटंबना करणाऱ्या दोघांना शिक्षा
- आणेवाडी टोल नाक्यावर वारकऱ्यांच्या गाड्यांना टोल वसुली; वारकरी आक्रमक
- विहिरीत पडलेल्या बिबट्याला पाच तासांच्या अथक प्रयत्नांनी जीवदान
- …अखेर विटा नगरपालिकेचे मुख्याधिकारी विनायक औंधकर निलंबित
- Ratnagiri : ‘बिपरजॉय’ चकीवादळामुळे जिल्ह्यात ‘अलर्ट’
- विदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र देशात अव्वल!
- मी भाजपचा कार्य़कर्ता….सौरभ पिंपळकर याचे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर फोटो व्हायरल