वृत्तसंस्था/ बेंगळूर
बंदर विकासाच्या क्षेत्रामध्ये लक्ष घालणाऱया अदानी पोर्टस्ने अलीकडेच कृष्णापट्टण बंदरात 25 टक्के हिस्सा खरेदी केला असल्याचे समजते. खरेदीचा व्यवहार 2 हजार 800 कोटी रुपयांचा झाला असल्याचेही सांगण्यात येत आहे. सदरच्या बंदरावर 38 मेट्रिक टन इतक्मया मालवाहतुकीचा व्यवसाय होत असून यातून 1 हजार 840 कोटी रुपयांचा नफा आर्थिक वर्ष 2021 मध्ये मिळण्याची शक्मयता सांगितली जात आहे.
अदानी पोर्टस् अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन यांच्यामार्फत एकंदरीत 75 टक्के इतका वाटा कृष्णापट्टण बंदरामध्ये मिळवण्यात आला आहे. आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिह्यामध्ये सदरचे बंदर स्थित असून सर्व हवामानाला तोंड देणारे बहुविध मालवाहतुकीची सुविधा असणारे हे बंदर आहे.