कणकवली / वार्ताहर:
कणकवली – परबवाडी येथील रहिवासी अनंत गोपाळ आरवलीकर (७२) यांचे सोमवार १३ सप्टेंबर रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. आरवलीकर हे जुन्या काळात गवंडी काम करीत असत. त्यामुळे त्यांना अनंत गवंडी म्हणून ओळखले जायचे. कणकवलीसह इतरही अनेक ठिकाणी त्यांनी घरांच्या बांधकामात अनेकांना मदत केली. गेले काही दिवस त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने गोवा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र सोमवारी त्यांचे निधन झाले. त्यांच्यावर कणकवली येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, मुलगी, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ठेकेदार प्रसाद व संतोष आरवलीकर यांचे ते वडील होत.