साहित्यः अर्धा किलो चक्का, अर्धा किलो साखर, काजू-बदाम तुकडे, पिस्त्याचे काप, एक वाटी अननसच्या बारीक केलेल्या फोडी, 1 चमचा पायनॅपल इसेंस
कृतीः चक्का चांगला फेटावा. नंतर त्यात साखर घालून मिश्रण पुन्हा एकदा चांगले फेटावे. थोडय़ा वेळाने त्यामध्ये अननसाच्या फोडी घालाव्यात. नंतर पायनॅपल इसेंस घालावे. सर्वात शेवटी काजू-बदामचे तुकडे, आणि पिस्त्याचे पातळ काप घालावेत. आता तयार श्रीखंड पुरीसोबत खाण्यास द्या.
टीपः अननस उपलब्ध नसल्यास पायनॅपल इसेंस वापरू शकता.
पुरी
साहित्यः 2 वाटय़ा गव्हाचे पीठ, चमचाभर तूप, मीठ, 1 चमचा दूध, 1 चमचा रवा, पाणी, तळण्यासाठी तेल
कृतीः गव्हाच्या पीठामध्ये सारे साहित्य घालून कणिक सैलसर मळून पंधरा मिनिटे ठेवावी. नंतर त्याचे छोटे गोळे बनवून पुरी लाटावी. तयार पुरी गरम तेलात हलक्या सोनेरी रंगावर तळून पेपरनॅपकीनवर काढावी. आता तयार पुरी श्रीखंड सोबत खाण्यास द्या.
टीपः पाव वाटी मटारचे वाटण,
हिरवी मिरची पेस्ट पुरीसाठी वापरु शकता.