युएस मिलिट्री अकॅडमीतून पदवी प्राप्त करणारी पहिली शीख महिला
वॉशिंग्टन :
सेकंड लेफ्टनंट अनमोल नारंग अमेरिकेच्या मिलिट्री अकॅडमीतून पदवी प्राप्त करणारी पहिली शिख महिला ठरणार आहे. अनमोलने वेस्ट पॉइंट मिलिट्री अकॅडमीतून न्यूक्लियर इंजिनियरिंगमध्ये 4 वर्षांच्या पदवीचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. अनमोल हवाई सुरक्षा यंत्रणेच्या क्षेत्रात काम करू इच्छिते. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या उपस्थितीत पदवी प्रदान करण्याचा सोहळा पार पडला आहे. पदवी प्राप्त केल्यावर अनमोलला ओक्लोहोमाच्या फोर्ट सिलमध्ये बेसिक ऑफिसर लीडरशिफ कोर्स (बीओएलसी) पूर्ण करावा लागणार आहे. या अभ्यासक्रमानंतर अनमोल अमेरिकेच्या वायुदलात सामील होणार आहे. नारंगची पहिली नियुक्ती जानेवारी 2021 मध्ये जपानच्या ओकीनोवामध्ये होणार आहे. वेस्ट पॉइंट अकॅडमीतून पदवी अभ्यासक्रम पूर्ण केल्याने अत्यंत उत्साही आणि आनंदी आहे. स्वप्न पूर्ण झाल्याने गौरवान्वित वाटत आहे. जॉर्जियाच्या शीख समुदायाने माझ्या वाटचालीत मदत केली आहे. कुठल्याही क्षेत्रात कारकीर्द घडविता येते असा विश्वास माझ्या लक्ष्यप्राप्तीमुळे अन्य अमेरिकन शिखांना प्राप्त होणार असल्याचे अनमोलने म्हटले आहे. जॉर्जियाच्या शीख कुटुंबात जन्मलेल्या अनमोलचे आजोबा भारतीय सैन्यात कार्यरत होते. अनमोलाचे कुंटुंब दोन पिढय़ांपासून अमेरिकेत वास्तव्यास आहे.