मुद्रांक घोटाळय़ावर आधारित पटकथा
2020 या वर्षात अत्यंत चर्चेत राहिलेली आणि यशस्वी वेब सीरिज ‘1992- द हर्षद मेहता स्टोरी’नंतर सोनी लिवने आता स्कॅम प्रंचाइजीला पुढे नेत याच्या दुसऱया सीझन स्कॅम 2003 ची घोषणा केली आहे. दुसरा सीझन देखील हंसत मेहताचे दिग्दर्शित करणार आहेत. एप्लॉज एंटरटेनमेंटने गुरुवारी यासंबंधी घोषणा करत ‘स्कॅम 2003- द क्युरियस केस ऑफ अब्दुल करीम तेलगी’विषयी माहिती दिली आहे. याची पटकथा पत्रकार संजय सिंग यांचे हिंदी पुस्तक ‘रिपोर्टर की डायरी’वर आधारित आहे. संजय सिंग यांनीच हा घोटाळा उघडकीस आणल्याचे मानले जाते.
स्कॅम 2003 प्रामुख्याने अब्दुल करीम तेलगीची कथा असणार आहे. खानापुरात जन्मलेला तेलगी कशाप्रकारे अनेक राज्यांमध्ये फैलावलेल्या तसेच 20 हजार कोटी रुपयांच्या घोटाळय़ाचा सूत्रधार झाला हे सीरिजमध्ये दर्शविण्यात येणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज नाव असलेल्या किरण यज्ञोपावित यांना पटकथेची जबाबदारी देण्यात आली आहे. सीरिज पुढील वर्षी सोनी लिव्हवर प्रदर्शित होणार आहे.
तेलगीचा बनावट मुद्रांकाचा गोरखधंदा अनेक राज्यांमध्ये फैलावलेला होता. तेलगीने बनावट मुद्रांक छापण्यासाठी 350 जणांना कामावर ठेवले होते असे उघड झाले होते. या घोटाळय़ात अनेक राजकारणी तसेच शेकडो अधिकारी सामील असल्याचे बोलले जायचे.