राजेंद्र होळकर / कोल्हापूर
अब्दुल लाट (ता. शिरोळ) गावची एका कन्येची पॅरिस येथे भारतीय दूतावासमध्ये द्वितीय सचिवपदी नियुक्ती झाली. पूजा प्रियदर्शनी असे तिची नाव असून, माजी परराष्ट्रीय सचिव ज्ञानेश्वर मुळे (राष्ट्रीय मानव आयोग ) यांची मुलगी आहे. ती शुक्रवारी ( 28 ऑगस्ट ) रोजी देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी पॅरिसला रवाना झाली असून, गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पूजाने कोलंबिया विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षण घेतले असून, नोकरी करीत तिने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा अभ्यास सुरु केला. गेल्यावर्षीच्या ( सन 2019 ) केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत संपूर्ण देशांमध्ये 11 व्या क्रमांकाने उत्तीर्ण होवून, तिने घवघवीत यश संपादन केले होते.
याच दरम्यान तिने एका आंतरराष्ट्रीय कंपनीत वरिष्ठ अधिकारी म्हणून काम केले आहे. पूजाची आई साधना शंकर या देखील दिल्ली येथे भारतीय राजस्व सेवेत मुख्य सचिव म्हणून कार्यरत आहेत. माजी परराष्ट्रीय सचिव ज्ञानेश्वर मुळे (राष्ट्रीय मानव आयोग ) यांच्या हातावर हात मारीत त्यांची कन्या पूजा ही देश सेवेसाठी शुक्रवारी ( २८ ऑगस्ट ) पॅरिसला रवाना झाली आहे.
विशेष म्हणजे पुजाला आई-वडीलाप्रमाणे लेखनात रस असून, तिनेही अनेक देशाचा प्रवास केला आहे. तिच्या या यशाने अब्दुल लाटमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
Related Posts
Add A Comment