ऑनलाईन टीम / मुंबई :
बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणी एनसीबीकडून तपासाला गती आली आहे. त्यातच दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल याचंही नाव ड्रग केसमध्ये समोर आले होते. यासंदर्भात त्याची चौकशीही करण्यात आली होती.

त्यानंतर एनसीबीने आज पुन्हा एकदा अर्जुन रामपालला समन्स बजावले आहे. एनसीबीने 16 डिसेंबर रोजी अर्जुन रामपालला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, ड्रग कनेक्शन प्रकरणी अर्जुन रामपालची याआधी चौकशी झाली करण्यात आली आहे. सुशांत सिंह मृत्यू प्रकरणानंतर बॉलिवूड ड्रग कनेक्शन समोर आले होते. सध्या एनसीबी याप्रकरणी कसून तपास करत आहे.
अर्जुन रामपाल व्यतिरिक्त त्याची गर्लफ्रेंड गॅब्रिएलाची देखील एनसीबीने सलग दोन दिवस 6-6 तासांसाठी चौकशी केली होती. दरम्यान, एनसीबीने काही दिवसांपूर्वी अर्जुन रामपालच्या वांद्र्यातील घराची झडती घेतली होती. त्यावेळी एनसीबीने अर्जुनच्या घरातून त्याचा लॅपटॉप, मोबाईल फोन आणि टॅब जप्त केला होता. त्यावेळी अर्जुनच्या ड्रायव्हरचीही चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर अर्जुन रामपाल आणि गॅब्रिएला डेमेट्रायडिसला चौकशीची नोटीस देण्यात आली होती.