प्रतिनिधी/ कोल्हापूर
मराठी चित्रपट सृष्टीतील सुपर स्टार अभिनेते भरत जाधव यांच्या मातोश्री श्रीमती शांताबाई गणपतराव जाधव (वय 80, रा. काशिद कॉलनी, साने गुरूजी वसाहत) यांचे मंगळवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. श्रीमती जाधव यांच्या पार्थिवावर मंगळवारी रात्री उशिरा कसबा बावडा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. शांताबाई जाधव आणि गणपतराव जाधव या दाम्पत्याने खडतर परिस्थितीतून आपल्या मुलांना शिक्षण देत मोठे केले. अभिनेते भरत जाधव यांच्या जडणघडणीत जाधव दाम्पत्याचा मोलाचा वाटा होता.