ऑनलाईन टीम / मुंबई :
श्वास घेण्यास त्रास होत असल्याने अभिनेते संजय दत्त यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची कोरोना रॅपिड टेस्ट निगेटिव्ह आली आहे.
संजय दत्त यांना शनिवारी सायंकाळी श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यानंतर त्यांना तात्काळ लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात दाखल करताच त्यांची कोरोना रॅपिड टेस्ट करण्यात आली. ती टेस्ट निगेटिव्ह आली. त्यांची स्वॅब टेस्टही करण्यात आली आहे. आज त्याचे रिपोर्ट येतील.
सध्या त्यांची ऑक्सिजन लेवल कमी जास्त होत आहे. त्यादृष्टीने उपचार सुरु आहेत. मात्र, कोरोनाचा अहवाल आल्यानंतरच डॉक्टरांना पुढील उपचारांची ठोस दिशा निश्चित करता येणार आहे. त्यामुळे त्यांना कोविड वार्डात ठेवण्यात आले नाही, असे लीलावती रुग्णालयाचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर डॉ. वी. रविशंकर यांनी सांगितले.